राज्यात १२१ सोयाबीन खरेदी केंद्र सुरु - खोत

राज्यात 121 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. गरज असल्यास आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलीय. 

Updated: Oct 30, 2017, 07:47 PM IST
राज्यात १२१ सोयाबीन खरेदी केंद्र सुरु - खोत title=

कोल्हापूर : राज्यात 121 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. गरज असल्यास आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलीय. 

10 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्याचे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहितीही खोत यांनी दिलीय. तसंच 12 टक्के आर्द्रता असेल तरच सोयाबीन खरेदी केला जाईल असंही त्यांनी नमूद केलं. 

तर राज्यातील ऊस दराबाबत 2 नोव्हेंबरला पणन मंत्र्याकडे मंत्रालयात  बैठक आयोजित केली आहे. एफआरपीनुसार जो दर ठरला तो सर्व साखर कारखान्यांना द्यावाच लागेल नाहीतर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.