तब्बल १५ कुत्र्यांनी ९ वर्षांच्या मुलाचे लचके तोडले

अंगावर शहारे आणणारी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडली. अवघ्या ९ वर्षांच्या अनिकेत सोनवणेवर तब्बल १५ कुत्र्यांनी हल्ला केला.  

Updated: Nov 11, 2020, 02:56 PM IST
तब्बल १५ कुत्र्यांनी ९ वर्षांच्या मुलाचे लचके तोडले  title=

नाशिक : अंगावर शहारे आणणारी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडली. अवघ्या ९ वर्षांच्या अनिकेत सोनवणेवर तब्बल १५ कुत्र्यांनी हल्ला केला. (15 dogs attacked 9 years son at Chandwad in Nashik)  या हल्ल्यात अखेर त्याचा एक पाय निकामी झाला आहे.

चांदवडच्या (Chandwad) दुगावात राहणारा अनिकेत १५ ऑक्टोबर रोजी खेळण्यासाठी घराबाहेर गेला. त्यावेळी अचानक कुत्र्यांनी हल्ला केला. यातही तो घाबरला नाही, त्याने जवळच असलेल्या काठीने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांची संख्या जास्त होती. त्यामुळे अनिकेत काही करू शकला नाही.

सध्या अनिकेतवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाबाबत आता शासनाने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.