मुलाने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीने केली आत्महत्या

लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.  

Updated: Apr 19, 2018, 10:43 AM IST
मुलाने लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीने केली आत्महत्या

औरंगाबाद : लग्नाचा तगादा लावणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. औरंगाबादच्या वडनेर गावात ही दुर्घटना घडली. दरम्यान, त्रास देणाऱ्या रामानंद राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नासाठी मागे लागून त्रास देणाऱ्या मुलला कंटाळून औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात तरुणीने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडनेर गावची ही घटना आहे. पीडित मुलीच्या शेजारी राहणार रामानंद राठोड  तिला सतत त्रास देत होता. लग्नाची मागणी करत होता, अशी तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

दरम्यान, तुझं लग्न कुठं होऊ देणार नाही, भावाला जीवे ठार मारीन, अशा धमक्या देत असल्याचा ही अश्विनीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. अखेर या सगळ्यांना कंटाळून बुधवारी दुपारी अश्विनीने गळफास लावत आत्महत्या केली. याप्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.