राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत.

Updated: Apr 19, 2018, 07:12 AM IST
राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे यांचा १ मे पासून महाराष्ट्र दौरा सुरु होतोय. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज ठाण्यात पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानतंर आता ते थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

महाराष्ट्रातर अशी पहिलीच कार्यशाळा होत असून पहिला कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. त्यानंतर विविध शहरांमध्ये अशा कार्यशाळा  होतील.. ठाणे शहरात मनसेचे १२६ पदाधिकारी आहेत. त्यांना लोकपयोगी कामं कशी करायची, जनसंपर्क कसा वाढवायचा अशा मुद्द्यांवर राज ठाकरे मार्गदर्शन करतील.