नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं

राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 09:38 AM IST
नागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं title=

नागपूर : राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विरोधकांना टोला

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विरोधकांची टेप अजूनही सैराटवरच अडकली असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. त्याचवेळी हल्लाबोलवाल्यांच्या डल्लामारचे आपण पुरावे देणार असल्याचा इशाराही त्यांनी या निमित्तानं दिला.

२९ डिसेंबरपर्यंत चालणार अधिवेशन

कापूस तसंच धान उत्पादन वाढल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच बोंड अळीग्रस्तांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर 3 वर्षात गोसीखुर्दचं काम पूर्ण होईल असा दावाही केला. आधारकार्ड जोडणी ही पारदर्शी आणि गतीमान कामासाठीच असल्याचंही ते म्हणाले. २९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.

कामकाज पुढे वाढवण्याची मागणी

आतापर्यंत २२ डिसेंबर पर्यंतचे कामकाज निश्चित झाले असले तरी विरोधी पक्ष नेत्यांनी हे कामकाज आणखी पुढे वाढवावे असे पत्र दिल्याने अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. १२ डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.