अमरावतीत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २ जणांचा बुडून मृत्यू

सुर्यगंगा नदीत पोहायला गेले असताना बुडून मृत्यू

Updated: Sep 14, 2020, 08:41 PM IST
अमरावतीत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २ जणांचा बुडून मृत्यू title=

अमरावती : अमरावतीत २ जणांचा नदीत बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक या गावात घडली आहे. गंगाधर लक्षण गजबे आणि त्यांच्या मित्राचा बुडून मृत्यू झाला आहे.

दोन दिवसा पूर्वी आईला साप चावल्याने गंगाधर गजबे हे आपल्या आईला भेटण्यासाठी नागपूर येथून आपल्या मूळ गावी शेंडोळा बुजरूक येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत नागपूर येथील एक मित्र ही आला होता. आज हे दोघेही दुपारच्या सुमारास गावनजीक असलेल्या सुर्यगंगा नदीत पोहायला गेले होते.

परंतु या दोघानाही पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेची महिती मिळताच शोध व बचाव पथक दाखल होऊन त्यांनी दोन्ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. पण तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.