लग्न पंधरा दिवसांवर, महिला डॉक्टरची आत्महत्या

 १३ मार्चला रोजी डॉ. शादाब यांचं लग्न होणार होते.

Updated: Feb 26, 2020, 09:30 PM IST
लग्न पंधरा दिवसांवर, महिला डॉक्टरची आत्महत्या

औरंगाबाद : लग्न ठरले. १५ दिवसांवर लग्न आले होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटण्यात येत होत्या. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, लग्न ठरलेल्या २८ वर्षीय महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने होत्याचे नव्हते झाले. दरम्यान, या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. १३ मार्चला रोजी डॉ. शादाब यांचं लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या आधीच आपले जीवन त्यांनी संपविल्यांने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

औरंगाबादमध्ये कटकट गेट भागात राहत्या घरी डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ यांनी आत्महत्या केली. शासकीय कर्करोग रुग्णालयात त्या कार्यरत होत्या. खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे येत्या १३ मार्च रोजी शादाब यांचे लग्न होणार होते, मात्र नक्की असं काय घडलं की त्यांनी आत्महत्या केली याचीच चर्चा सुरु आहे. पोलीसही त्यादृष्टीने तपास करत आहेत.

डॉ. शादाब यांचे अमरावतीमधील एका व्यापाऱ्याशी लग्न ठरले होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी शादाबही आई-बाबांबरोबर गेली होती. लग्न खरेदी सुरु असताना डॉ. शादाब या अचानक घरी आल्यात. त्यांनी घरी गळफास घेत स्वत:ला संपविले. त्यांनी ओढणीने गळफास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.