Nashik Dajiba Veer : होळीचा उत्सव म्हटलं की विभागानुसार प्रथा बदलतात. नाशिकमध्ये रंगपंचमीलाच रंगांचा खेळ खेळला जातो. त्याऐवजी धुळवडीच्या दिवशी साजरा होतो तो बाशिंगवीरांचा शिमगा. नाशिकमध्ये आगळ्या-वेगळ्या पद्दतीनं धुळवड साजरी होते. महाराष्ट्रातील या अनोख्या होळीला 300 वर्ष जुनी पंरपरा आहे.
नाशिकचा ही दाजीबा वीराची ही मिरवणूक. फाल्गुन प्रतिपदा म्हणजेच धुलीवंदन. 300 वर्षांपासून या मिरवणुकीची परंपरा आहे. या मिरवणुकीत दाजीबा वीर जवळपास 18 तास या मिरवणुकीत नाचतो. आणि भक्तांना दर्शन देतो. रात्री बाराच्या दरम्यान तो नृत्य कला सादर करतो. या विराकडे केलेली मनोकामना पूर्ण होते अशी अनेकांची श्रद्धा आहे. ह्या विराची मनोभावे पूजा करत प्रत्येकाच्या अंगणात आल्यावर स्वागत आणि औक्षण केलं जातं. जून्या नाशकातील बेलगावकर यांच्याकडे 40 वर्षांपासून दाजीबाचा मान देण्यात आला आहे.
वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते सकाळी नऊ वाजेपर्यंत ही सगळी मिरवणूक सुरू होते. अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढून नारळ बाशिंग लावत त्यांच्या स्वागत करतात. नाशिकमध्ये अनेक मिरवणुका निघतात मात्र दाजी बळविर मानाचा बीर आहे आणि त्याचं दर्शन घेण्याची परंपरा आहे अनेक लोकांची नवस देखील पूर्ण होतात अनेकांचे विवाह जमत नाही ते नवस केल्यानंतर त्यांचे विवाह जमतात आणि त्यांना मुलं होत नाही नवस केल्यानंतर त्यांची मुलं होतात आणि त्या मुलांना देखील दर्शनासाठी घेऊन येतात.
दाजीबा वीराला मोठा इतिहास आहे. दाजीबा विर आज हळद लागली होती. मात्र लग्न झालं नव्हतं मात्र त्या वेळेला त्यांनी ज्या लोकांच्या लग्न जमत नाही. त्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी काम करेल अशा पद्धतीची आख्यायिका आहे. अनेकांना नवस केल्यानंतर मुलगी ची झालेली आहे आणि त्यांची लग्न देखील जमतात त्यामुळे दर्शनासाठी मोठी गर्दी होते.
अनेक श्रद्धाळू दाजीबा वीराला नारळ ओटी आणि नवसाचा खण वाहतात, गाऱ्हाणी गातात. पंचवटीत असेच अनेक वीर वेगवेगळ्या वेशभूषेत एकत्र येऊन वीर नाचवतात. शिवाय लहान मुलांनाही विराच्या हातात देऊन नाचवण्याची परंपरा आहे. राज्यभर आज रंग उधळले जात असले तरी नाशिकची होळी अनोखी आहे. त्यामुळे तिचा थाटही वेगळा आहे.