Accident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश

Ahmednagar Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला. जीपने दोन चुकारीस्वारांसह आठ जणांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन चिमुकल्यांसह एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated: Mar 28, 2023, 08:52 AM IST
Accident News : जीप आणि दुचाकी अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश

Ahmednagar Kalyan highway Accident : अहमदनगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे भीषण अपघात झाला. जीपने दोन चुकारीस्वारांसह आठ जणांना चिरडले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल रात्री घडला. अंधाराच्यावेळी तिन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दोन चिमुकल्यांसह एक महिला आणि पुरुष यांचा मृत्यू झाला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर कल्याण महामार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. दरम्यान, जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी स्थानिकांनी माहिती दिली. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळाली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

उल्हासनगर अपघातात तरुणाचा मृत्यू

दुसऱ्या एका अपघातात उल्हासनगर येथे तरुणाचा जागी मृत्यू झाला. मालवाहू ट्रकने तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगरच्या  क्रिटिकेअर रुग्णालयासमोर घडली आहे.  सुशील अशोक केदारे (22) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुशील हा क्रिटिकेअर रुग्णालया समोर असलेल्या रिक्षा गॅरेजमध्ये कामाला होता.

काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास  पंजाबी कॉलनी येथील भाग्यश्री ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची मालवाहतूक ट्रक क्रिटिकेअर रुग्णालयाच्या दिशेने आली आणि याच ठिकाणी असलेल्यe संत शिरोमणी चौकाच्या भिंतीला खेटून उभा असलेला सुशीलला येणाऱ्या  ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत सुशील गंभीर जखमी झाल्याने समोरच असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु  डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले आहे. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी पंचनामा करत ट्रक ताब्यात घेतला आहे.