आज राज्यात कोरोनाचे ४८७८ रुग्ण वाढले

आज राज्यात ४८७८ रुग्णांची वाढ झाली आहे.

Updated: Jun 30, 2020, 09:17 PM IST
आज राज्यात कोरोनाचे ४८७८ रुग्ण वाढले

मुंबई : आज राज्यात ४८७८ रुग्णांची वाढ झाली आहे. तर ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात २४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या ४८ तासात ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५० रुग्णांचा मृत्यू हा मागील कालावधीतील आहे. राज्यात मृत्यूदर आता ४.४९ इतका झाला आहे. 

आज राज्यात १९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ९०,९११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ९,६६,७२३ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले, ज्यापैकी १,७४,७६१ रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ५,७८,०३३ जण होम क्वांरटाईन आहेत तर ३८,८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे ७५,९७९ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ज्यांचावर उपचार सुरु आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील ५७, ठाणे मनपातील १५, भिवंडी ४२,  कल्याण-डोंबिवली २, मीरा-भाईंदर ४, ठाणे ३, पालघर ५, पनवेल ७, सोलापूर ६, औरंगाबाद ४, पुणे ३, नाशिक १ आणि जळगावमधील १ रुग्णाचा समावेश आहे.