वडू गाव : पुणे जिल्ह्यातल्या वढू गावामधल्या ७ जणांची येरवडा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. २९ डिसेंबरला वढू गावात गोविंद गोपाळ गायकवाड समाधीची मोडतोड झाल्यानंतर ४९ जणांवर अॅट्रोसीटीचा गुन्हा नोंद होता. त्यापैकी ७ जणांना अटक झाली होती. त्यांची सुटका करण्यात आली.
पुणे सत्र न्यायालयाने या सात जणांना शनिवारी जामीन मंजूर केला होता. सुषमा ओव्हाळ यांनी याबाबत तक्रार दिली होती. मात्र दोन्ही बाजुकडील लोकांमध्ये समेट झाला आणि तक्रार मागे घेण्याचा निर्णय झाला आणि गोविंद महाराजांची समाधी पुन्हा बांधण्याचाही निर्णय झाला. त्यानंर सुषमा ओव्हाळ यांनी न्यायालयासमोर हजर राहून तक्रार मागे घेतली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातल्या सात जणांना जामीन मंजूर केला.