राज्यात आज कोरोनाच्या ८४१ रुग्णांची वाढ, तर ३४ रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १५ हजार ५२५ वर

Updated: May 5, 2020, 09:28 PM IST
राज्यात आज कोरोनाच्या ८४१ रुग्णांची वाढ, तर ३४ रुग्णांचा मृत्यू title=

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे आणखी ८४१ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १५ हजार ५२५ वर पोहोचली आहे. तर आज कोरोनाच्या ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णांची वाढ सुरुच आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजाराजवळ पोहोचते आहे. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत. 

मुंबई महापालिकेनुसार मुंबईत गेल्या २४ तासांत ६३५ रूग्ण वाढले असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ९७५८ झाली आहे, तर एकूण ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे

- पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचे ११ रुग्ण वाढले, शहरात एकूण रुग्ण १३५ वर

- आज पुणे जिल्ह्यात ९९ रूग्ण वाढले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २२०२ वर, आतापर्यंत ११९ जणांचा मृत्यू तर ५५३ जणांना डिस्चार्ज 

- कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ११ रुग्ण वाढले. कोरोना रुग्णांची संख्या २२४ वर, आतापर्यंत ७४ जणांना डिस्चार्ज

- बदलापूरमध्ये कोरोनाचे आणखी ५ रुग्ण वाढले. एकूण रुग्णांची संख्या ४२ वर

- पनवेलमध्ये आज कोरोनाचे ५ रुग्ण वाढले. पनवेलमध्ये एकून रुग्णांची संख्या १०७ वर. तर आतापर्यंत ३९ रुग्ण बरे.

- रत्नागिरीमध्ये कोरोनाचे आणखी ४ नवे रुग्ण, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५ वर.

- धारावीत आज ३३ नवे रूग्ण वाढले, एकूण कोरोना रूग्णांची संख्या पोहचली ६६५ वर

- नवी मुंबईत कोरोनाचे ४७ रुग्ण वाढले. एकूण रुग्ण संख्या ३९५ वर