प्रकृती अस्वस्थामुळे संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो वसईला परतले

समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शाशंकता 

Updated: Jan 11, 2020, 11:35 AM IST
प्रकृती अस्वस्थामुळे संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो वसईला परतले

उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष फादर दिब्रोटो प्रकृतीच्या कारणामुळे वसईला परतले आहेत. संमेलनाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात फादर दिब्रोटो यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे मला जायला परवानगी द्या अशी सर्वाना विनंती केली होती.

फादर प्रकृती अस्वस्थतेमुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्हील चेअर वरून आले होते. समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबद्दल शशांकता निर्माण होत आहे. 93 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो वसईला परतले आहेत. यामुळे सगळीकडेच चिंता व्यक्त केली जात आहे. 

मोठ्या उत्साहात शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. या संमेलनाला वादाचाही पार्श्वभूमी होती. या संमेलनाला जाऊ नका, असं आवाहन ब्राह्मण महासंघानं उदघाटक ना. धो. महानौरांना केलं होतं. साहित्यिकाला जात नसते, असं महानोरांनी संमेलनाच्या मंचावरुनच ठणकावलं.  दुसरीकडे या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहू नका, असे आवाहन करणारं पत्र पुण्याच्या ब्राह्मण महासंघानं आपणाला पाठवलंय, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ साहित्यिक, कवी, पद्मश्री आणि संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांनी केला.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली. सुधारणावादी लेखक, विचारवंत अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे. २०१३ सालचा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.