राज्यात आज मध्यरात्रीपासून दूध महागणार

 राज्यात आज मध्यरात्रीपासून दूध दोन रुपयांनी महागणार आहे. 

Updated: Jan 11, 2020, 10:24 AM IST
राज्यात आज मध्यरात्रीपासून दूध महागणार

मुंबई : राज्यात आज मध्यरात्रीपासून दूध दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे आजपासून गायीचे दूध 48 रुपये प्रति लीटर आणि म्हशीचे दूध 58 रुपये प्रति लिटर दराने खरेदी करावे लागणार आहे. राज्य दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने गायीच्या तसेच म्हशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दूध विक्री दर 

देशात दुधाचे उत्पादन 10 टक्क्यांनी घटले आहे. त्याच प्रमाणे दूध भुकटी ची मागणी वाढली आहे. त्यामुळे दुधाचे संकलन कमी झाले आहे. या परिस्थितीत इतर राज्यातील दूध संस्था महाराष्ट्रातील दूध पळवत आहेत. ते टाळण्यासाठी राज्यातील दूध उत्पादकांना दर वाढवून देणे गरजेचं आहे. दूध उत्पादकांना दर वाढवून दिल्यामुळे दुध विक्री दर वाढवण्यात आल्याचं कल्याणकारी संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.