एका बॅनरने मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली..

आधीच अनेक समस्यांच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मरेला कोलमडायला काल विचित्र कारण कारणीभूत ठरले. जोरदार वाऱ्याने उडालेला एक बॅनर रेल्वे मार्गावरून वेगाने जात असलेल्या दुरंतो एक्स्प्रेसच्या पेंटग्राफमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली.

Updated: Oct 17, 2017, 09:25 AM IST
एका बॅनरने मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली.. title=

मुंबई : आधीच अनेक समस्यांच शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मरेला कोलमडायला काल विचित्र कारण कारणीभूत ठरले. जोरदार वाऱ्याने उडालेला एक बॅनर रेल्वे मार्गावरून वेगाने जात असलेल्या दुरंतो एक्स्प्रेसच्या पेंटग्राफमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटली.

शहाड आणि आंबिवलीच्या दरम्यान ही घटना घडली.  त्यामुळे कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. या घटनेमुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे कमालीचे हाल झालेत.

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा खोळंबल्या होत्या. सुमारे तासभारने ११ वाजता बिघाड दुरुस्त होऊन वाहतूक सुरू झाली असली तरी गाड्या पाऊण ते १ तास उशिराने धावत होत्या.