धक्कादायक! पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन

राज्यात  21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  भरती दम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन सापडले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 21, 2024, 08:33 PM IST
धक्कादायक! पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन title=

Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलिस दलात विविध 17 हजार रिक्त पदासांठी भरती होत आहे.  17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन सापडले आहे. बीडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय..  इंजेक्शन तपासणीकरिता सॅम्पल घेण्यासाठी अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले... हे सॅम्पल मुंबईच्या प्रयोगशाळेकडे पाठवले.... प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितले.

या आढळलेल्या इंजेक्शनची सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलिस यंत्रणा सतर्क झाले असून उमेदवारांच्या बॅगांचे देखील आता कसुन तपासणी केली जाणार आहे.

उमेदवार इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न का करतात? 

साधारणता व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते. हे इंजेक्शन तेच असावे असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले. 

नांदेडमध्ये पावसामुळे  पोलीस भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया रद्द

नांदेडमध्ये पावसामुळे  पोलीस भरतीची शारीरिक चाचणी प्रक्रिया रद्द  करण्यात आली. नांदेड शहरात काल रात्री पाऊस पडल्यामुळे पोलीस परेड मैदानावर पाणी साचलं. त्यामुळे पोलीस भरतीची शारीरिक चाचणी पुढे ढकलली. पुढील तारीख उमेदवारांना मेलआयडीवर आणि नांदेड पोलिसांच्या वेबसाईट वर कळवली जाणारेय.

इन कॅमेरा पोलीस भरती

बुलढाणा जिल्ह्यातही 133 रिक्त पदांसाठी तब्बल 10 हजार 236 उमेदवारांनी अर्ज केलाय. जिल्ह्याच्या मुख्यालय पोलीस मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच मैदानी चाचण्या सुरू आहेत. पारदर्शकता असावी म्हणून पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ही भरती इन कॅमेरा घेतली जातेय .
अमरावतीत पावसामुळे पोलीस भरती रखडलीये...मैदानावर चिखल झाल्याने विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी रखडलीये...दरम्यान भरती प्रक्रिया स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलीये...