मोठी बातमी । भाजप नेते नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

Nilesh Rane : भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते आता अडचणीत आले आहेत.

Updated: Feb 2, 2022, 11:41 AM IST
मोठी बातमी । भाजप नेते नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल title=
संग्रहित छाया

सिंधुदुर्ग : Nilesh Rane : भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी नीलेश राणे यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलीस स्थानकात रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

काल भाजप आमदार नितेश राणे यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहेत. व्हिडीओ शूटिंग पाहून अन्य जणांवर ही गुन्हे दाखल केले जाणर आहेत.

जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्याप्रकरणी आणि जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच  पोलिसांशी हुज्जत घातली सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हे दाखल करण्यात आलेत.

दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज बुधवारी केसची नोंदणी होऊन प्राथमिक सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सत्ताधारी राजकीय सूडबुद्धीने ही केस लढवत असल्याचे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.