जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

Honor killing at Chopda​ : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.  

Updated: Aug 13, 2022, 02:14 PM IST
जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे title=

जळगाव : Honor killing at Chopda : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाची गोळी मारुन तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. (A girl and a young man were killed in a love affair In Jalgaon) धक्कादायकबाब म्हणजे तरुणीच्या अल्पवयीन भावानेच दोघांची हत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. हत्या केल्यानंतर पिस्तूलासह पोलीस ठाण्यात पीडीत तरुणीचा भाऊ हजर झाला.

जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना घडल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांची हत्या करण्यात आली आहे. या मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्तुल घेऊन पोलिसात हजार झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. 

दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे.  प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पीडीत तरुणीचा अल्पवयीन भाऊ यानेचे पोलीस फिर्याद दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक रावले हे करीत आहेत.