ऑनलाईन लॉ़टरी लागल्याचे सांगितलं, पण... ज्येष्ठ नागरिकासोबत धक्कादायक प्रकार

Pune Crime: सध्या पुण्यातही गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यावेळी मात्र हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत झाला आहे.

Updated: Jan 12, 2023, 10:11 PM IST
ऑनलाईन लॉ़टरी लागल्याचे सांगितलं, पण... ज्येष्ठ नागरिकासोबत धक्कादायक प्रकार title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या पुण्यातही गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यावेळी मात्र हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत झाला आहे. तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे असं सांगून ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या एकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली. ऑनलाइन फसवणुकीचे (Online Crime) प्रकार आपण नेहमी पाहतो ऑनलाईन फसवणुकीत अनेक जणांना लाखो रुपयांना घडवलं जातं. मात्र आता लुटणाऱ्यांनी वेगळी मोडस सुरू केली आहे. पुणे शहरात दहा ठिकाणी दहा गुन्ह्यात एकच मोडस आरोपीने वापरली आहे. 

तुमच्या नवऱ्याला बक्षीस लागला आहे .त्यासाठी पैसे द्या. तुमच्या मुलाला लॉटरी (Lottery) लागली आहे, त्यासाठी पैसे लागतील. तुमचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागला आहे, तुम्ही येऊन भेटा, अशा वेगवेगळ्या मोडस वापरत दहा ठिकाणी आरोपीने गुन्हे केले आहेत. मात्र दहाव्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपीचा छडा लागला आणि सिंहगड पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. 

आरोपीकडून 15 तोळे सोनं एक बुलेट जप्त करण्यात आली आहे.आरोपी आफताफ उर्फ साजिद अहमद शेख अस अटक करण्यात आलेल्या नाव आहे, या अरोपीने पुण्यात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे गुन्हे केल्याच निष्पन्न झाले असून पोलिस या अरोपीने असे अजून कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास करत आहेत. या आरोपीकडून पोलिसांनी 9 लाख 62 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किंमतिची बुलेट मोटार सायकल असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सिंहगड पोलिसानी अटक केलेल्या आरोपीला कोर्टात हजर केलं असता कस्टडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस करत आहेत. 

असाच काही प्रकार घडाला आहे?

नागपुरात खोट्या नावानं सोन्याचं कड कुरियरने बोलवत पैसे न देता हिसकावून पळ काढणाऱ्याला बर्डी पोलिसांनी अखेर अटक केली.  अशपाक अनवर असं आरोपीचं नाव आहे. आरोपीने खोट्या नावानं ऑनलाइन 1 लाख 87 हजार रुपयाचं सोन्याचंकडे कॅश ऑन डिलिव्हरीवर बुकिंग केले होते. पण कुरियर बॉयला फ्रीडम पार्कपाशी बोलावल. पण पैसे न देता ऑनलाइन पे करतो म्हणत पार्सल हिसकावून पळून गेला. सीताबर्डी पोलिसानी वर्णनाहून त्याचा पोलीस रेकॉर्ड काढला असता अशपाक अनरला अखेर अटक केले. यावेळी त्यानं सोन्याचं कड 1 लाख 30 हजारात विकलं. याच पैश्याचे ऑनलाईन रमी (Online Crime News) आणि तिनपत्ती खेळत पैसे जुगारात हारले