10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले

Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.

Updated: Dec 7, 2022, 07:46 PM IST
10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले title=
nagpur News

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली. जितेंद्र गुप्त असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. जितेंद्र आणि पत्नी अंजनी गुप्ता दाम्पत्यानं 2019 मध्ये सुफी फंडचं ऑफिस थाटून एजंट नेमले होते. गुंतवणुकीला आकर्षक परतावा देण्याचं बतावणी करत लोकांना जाळयात ओढलं. पण परतावा देण्याची वेळ आली तेव्हा लोकांना पैसे देण्याऐवजी शिवागीळ करायला सुरुवात केली. त्या कंपनीच्या (fraud) एजंट ग्राहकांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुप्तता दाम्पत्यावर गुन्हा दाखल करत पती जितेंद्रला अटक केली. यात फसवणूक झालेल्यानी पुढे येत तक्रारी (investment) करण्याच आवाहन केलं. (a man arrested for cheating with 342 people in the name of investment)

अज्ञात चोरट्यानी 85 लाखाचा ऐवज पळवला सोबत सीसीटीव्हीचा डिव्हीआरही नेला

 नागपूरच्या सोनेगाव तलाव परिसरातील पॅराडाईज सोसायटी मधील घरातुन अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन किलो सोन्याचे दागिने रोख असा 85 लाखाचा ऐवज घेऊन पसार झाले. लक्ष्मीनारायण बाथो घरमालकाचं नाव आहे. घरातील सगळे देवदर्शनाला गेले असतांना अज्ञात चोरट्यानी घराच्या मागच्या बाजूला ग्रील तोडून प्रवेश केला. यात घरात असलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. यामध्ये तब्बल दोन किलोच्या घरात सोन्याचे दागिने आल्याचे तक्रार कर्त्याचे म्हणणे आहे. एकूण 85 लाखाचा मुद्देमाल चोरट्यानी चोरताना सीसीटीव्ही (cctv) कैद्य झाल्याच्या भीतीनं चोरट्यानी डिव्हीआर घेऊन. सोनेगाव पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.

मंदिरातून 65 हजारांचा ऐवज लंपास

चांदवडच्या लोहार गल्लीतील श्री खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी  मंदिरातील मूर्तीवरील 62 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व दानपेटी फोडून तीन हजारांची रोकड असा एकूण 65 हजारांचा ऐवज लंपास केला. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून एकाच रात्रीत चोरट्यांनी शहरातील इतर तीन मंदिरांमध्येही चोरीचा प्रयत्न केल्याने घबराट पसरली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे