मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसला अपघात, ६ प्रवासी जखमी

मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवर पनवेलपासून पाच किलोमीटर अंतरावर आदई गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झालेत. यात २५ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Surendra Gangan Updated: Apr 4, 2018, 10:14 AM IST
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर खासगी बसला अपघात, ६ प्रवासी जखमी title=

खोपोली : मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवर पनवेलपासून पाच किलोमीटर अंतरावर आदई गावाजवळ एक खासगी ट्रॅव्हल बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ६ जण जखमी झालेत. यात २५ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर  पनवेलजवळ सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची ही व्हॉल्वो बसला अपघात  झाला. वेग जास्त असल्याने बस पलटी झाली. बसमध्ये २५ प्रवासी होते त्यातील ६ जण किरकोळ जखमी असून ,
त्यांना कामोठे येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यातील चार जण मुंबई तर एक उरण आणि सातारा येथील रहाणारे आहेत. 

सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची ही व्हॉल्वो बस आहे. मुंबई वरून पुण्याला जात होती . अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ बस बाजूला काढून वाहतू सुरळीत केली

जखमींची नावे

सारिका लोंढवे
निना गडदे
पूजा गडदे
शशिकांत खांडेकर
रवीचंद्र इलगट
रमण सरगर