कोरोना प्रकोप रोखण्यासाठी मुंबईहून नागपुरात येणार विशेष टीम

आज मुंबईहुन तज्ज्ञांची विशेष टीम उपराजधानीत पोहचत 

Updated: Sep 4, 2020, 08:20 AM IST
कोरोना प्रकोप रोखण्यासाठी मुंबईहून नागपुरात येणार विशेष टीम title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरात सुरु असलेला कोरोना प्रकोप  कोरोना रोखण्यासाठी आज मुंबईहुन तज्ज्ञांची विशेष टीम उपराजधानीत पोहचत आहे. गृहमंत्री विशेष विमानं या टीमला नागपुरात घेवून येतायत.

या टीमममध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. हेमल शहा, गंभीर रोग तज्ज्ञ डॉ. राहुल पंडीत, जनरल सर्जन डॉ. मुफझल लकडावाला, कान नाक घसा विशेषज्ञ डॉ. गौरव चतुर्वेदी यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टीम विशेष विमानाने नागपुरात दाखल होणार आहे.

मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा आणि धारावीसह इतर भागात  मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत होते.मात्र आता तेथिल परिस्थितीत सामान्य होत आहे. धारावी व कोळीवाडासह  इतर भागातील  कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी या डॉक्टरांच्या टीमचं विशेष योगदान राहिलंय. 

ही टीम नागपुरात विभागीय आय़ुक्त कार्यालयात आढावा घेणार आहे.ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न
केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाय योजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे.  

डॉ हेमल शहा, डॉ राहुल पंडीत, डॉ मुफझल लकडावाला, डॉ गौरव चतुर्वेदी यांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली  त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.