सव्वा लाख 'आयुष' डॉक्टरांना प्रशिक्षण देणार- राजेश टोपे

सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण 

Updated: Apr 4, 2020, 08:02 PM IST
सव्वा लाख 'आयुष' डॉक्टरांना प्रशिक्षण देणार- राजेश टोपे

मुंबई : राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेतून सर्वेक्षणाबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू आहे.आतापर्यंत सुमारे ९ लाख लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे. या कामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे.

राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवेदीक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या २५० मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे २५ हजार पीपीई कीट्स, दीड हजार व्हेंटीलेटर असून अडीच लाख ९५ मास्क उपलब्ध आहेत. राज्यात लवकरच नविन व्हेंटीलेटर उपलब्ध होणार असून आवश्यकता भासल्यास केंद्र शासनाकडून उपकरणांचा पुरवठा केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

नागरिकांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवी यासाठी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप यासोबतच ‘क’जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा असे देखील टोपे म्हणाले. नागरिकांनी स्वयंशीस्त पाळावी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे याचा पुनरोच्चार देखील टोपे यांनी यावेळी केला.