भर व्यासपीठावर अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान, आदित्य ठाकरे देणार प्रत्युत्तर?

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत राजीनामा देऊन निवडणुकीस सामोरे जाण्याचे आव्हान दिलं होतं

Updated: Jul 31, 2022, 10:40 PM IST
भर व्यासपीठावर अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान, आदित्य ठाकरे देणार प्रत्युत्तर? title=

संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली आहे. तर आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेमधून बंडखोर आमदारांच्या मतदार संघामध्ये जात त्यांच्यावर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांना राजीनामा देऊन निवडणुकीस सामोरे जाण्याचे आव्हान दिलं. यावर आता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी एका सभेत बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींचे फोटो लावून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा. मीही राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जातो, असं आव्हान अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

गेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात ज्या फाईली रखडल्या होत्या त्या या मुख्यमंत्र्यांनी दहा दिवसांत सर्व फाईलींवर सह्या केल्या. मी उद्या फॅक्सने राजीनामा पाठवणार. मुख्यमंत्री स्विकारतील की नाही माहिती नाही असेही सत्तार म्हणाले.

दरम्यान, आता आदित्य ठाकरे यावर काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे