पुणे : पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या कुस्ती स्पर्धेत ने विजय मिळवत चांदीची मानाची गदा पटकावली आहे. साता-याच्या किरण भगतला अभिजीतने मात दिली आहे. अभिजीतने किरणला १०-७ ने मात दिली आहे.
अभिजीत कटके ही स्पर्धा जिंकला असला तरी साता-याच्या किरण भगतने त्याला सुरूवातीपासूनच जोरदार टक्कर दिली. पण मॅटवरील कुस्तीचा मोठा अनुभव असल्याने अभिजीतने हा सामना जिंकला. किरण भगत याला मातीतील कुस्तीचा अनुभव होता. त्याने अभिजीतीला चांगलीच टक्कर दिली.
पुण्यातील अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत मल्ला ही मानाची लढत झाली. पुण्याचा अभिजीत कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळवली आहे. कटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. अभिजित हा राष्ट्रीय खेळाडू असून सेमी फायनलमधे त्यानं गादी विभागात सहज विजय मिळवला होता.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत अभिजित कटकेनं सलग दुसऱ्यांदा धडक मारली होती. तर किरण भगत प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकला होता. अभिजित गादीत तर किरण माती विभागात प्रवीण आहे. आतापर्यंतची कामगिरी पाहता अभिजीतच पारडं जड वाटत होतं. त्यानुसार त्याने ही स्पर्धा जिंकली.