घोड्याने उडवलं पण बैलानं वाचवलं; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

खेडच्या बैलगाडा घाटात अपघात झाला आहे. शर्यतीत भर रस्त्यात उभं राहिल्यानं मुलहा घोड्याच्या पायाखाली चिरडला गेला. मुलगा देखील जखमी झाला आहे.

वनिता कांबळे | Updated: May 27, 2023, 05:55 PM IST
घोड्याने उडवलं पण बैलानं वाचवलं; काळजाचा ठोका चुकवणारी घटना title=

Bullock Cart Racing Accident : बैलगाडा शर्यत सुरु असताना अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. शर्यत पाहणाऱ्या एका मुलाले घोड्याने उडवले. पण, बैलाने या मुलाला वाचवले आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील खंडोबा निमगाव घाटात ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेत हा मुलगा थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बैलगाडा शर्यत सुरु असताना शर्य पहायला आलेल्यांनी खबदारी घेणे गरजेचे आहे. 

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा थेट घोड्याच्या पायाखाली आल्याचे दिसत आहे. यामुळे घोड्यासह घोड्यावर बसलेला मुलगाही पडला. यात घोड्याच्या पायाखाली आलेला मुलगा जखमी झाला. बैलगाडा घाटातून बेफाम धावणा-या बैलजोडीचा थरार पहाण्यासाठी हा मुलगा रस्त्यातच उभा होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. 

घोडेस्वार आणि चिमुकल्याचा घाटात अपघात

खेड तालुक्यातील खंडोबा निमगाव घाटात बौलगाडा शर्यतीचे आयोजन करम्यात आले होते.  बैलगाडा घाटातुन वा-याच्या वेगाने धावणा-या बैलजोडीचा थरार पहाण्यासाठी लहान मुलं कडाक्याच्या उन्हात थेट घाटाच्या मध्यावर उभी होती. अशातच बैलगाडाला दिशा देणारे घोडीही वा-याच्या वेगाने धावत असताना एक लहान मुलगा थेट घोडीच्या पायाखाली आला.  अन हा मुलगा जागीच चितपट झाला. यावेळी पाठीमागुन वेगाने येणा-या बैलाच्या पायाखाली जाणार तितक्यात बैलाने सावध भुमिका घेत मुलाला वाचवले. मात्र, घोडीच्या धडकेने मुलगा जखमी झाला आहे. तसेच घोडेस्वार तरुण देखील घोड्यावरुन पडून जखमी झाला आहे.  

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 90 वर्षांची परंपरा जपणारा बाभळगावचा मानाचा अश्व

जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात परभणीच्या पाथरी तालुक्यातील बाभळगावचा मानाचा अश्व दरवर्षी सहभागी होत असतो. बाभळगावचे विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने तीन पिढ्यापासून वारकरी संप्रदायाची परंपरा पाळली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर असणारा देवाचा मानाचा अश्व या घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होतो आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवत असतो. माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा (स्वार व्हायचा) अश्व असतो. देवाच्या अश्वावर माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात. रणेर घराण्याने ही परंपरा तीन पिढ्यांपासून म्हणजे सुमारे 90 वर्षांपासून जपली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर देवाच्या अश्वाचा मान हा रणेर घराण्याचा आहे. तर स्वाराच्या अश्वाचा मान अकलुजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील हे सांभाळत आहेत.