कोल्हापूर : कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. काळ आणि वेळ कधी कुठे गाठेल याचा नेम नाही. बंगळुरुचे रहिवासी असलेल्या एका कुटुंबासोबत असाच प्रकार घडला. कोल्हापूर जिल्ह्यातील किनी जवळ विचित्र अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.
या भीषण अपघातात 11 वर्षांच्या मुलींसह कुटुंबाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे कुटुंब कारमधून जात होतं. त्यावेळी बंद पडलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. तर अपघात ग्रस्त कारला ट्रकने मागून धडक दिली.
कोल्हापुरातील या भीषण अपघातात कुटूंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब बंगळुरुचे रहिवासी होते. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड वरून पिडंकेपार गावाकडे जात असलेल्या मोटार सायकल झाडाला आदळून अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.
मृतकाचे नाव ईश्वर वाघमारे वय २२ वर्ष राहणार पिडंकेपार असल्याची माहिती मिळाली आहे. गाडी चालवणारा संदीप बागडेहरिया हा गाडीवर चौबल सीट जाताना गाडीचा संतुलन बिघडल्याने. रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला मोटारसायकल आदळली त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.