मुंबई : Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना कालच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना 39 आमदरांनी समर्थन दिले. मात्र राजन साळवी हे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठी संधी देत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी नाव पुढे केले. आता राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
We have filed the nomination of Shiv Sena MLA Rajan Salvi. Congress had the first claim but we sat down with Shiv Sena and NCP and this decision was taken together: Balasaheb Thorat, Congress leader on Maharashtra Speaker's election pic.twitter.com/Ewi4DVjdht
— ANI (@ANI) July 2, 2022
भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत होणार हे नक्की झाले आहे. अर्ज भरताना सुनील प्रभू, अरविंद सावंत, अशोक चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडी तीन प्रमुख पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने पत्र विधीमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांना सादर करण्यात आले आहे.