आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Updated: Jul 23, 2019, 10:49 PM IST
आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल title=

शिर्डी : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान श्रीरामपूर इथे झालेल्या सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून झालेल्या सभेसाठी कोणतीही परवानगी झाली नसल्याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या सभेदरम्यान मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली होती. त्यामुळे सभेचे आयोजक शिवसेना शहरप्रमुख निखील पवार तसेच मंडप व्यावसायिक रणजित शेळके यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

श्रीरामपुर शहरातील मुख्य रस्त्यावर मंडप टाकण्याच काम सुरू असताना पोलिसांनी त्यावेळीच का अटकाव केला नाही. पोलिसांचा मोठा फौजफाटा, वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात असताना अगोदर कारवाई का केली नाही, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.