गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?

Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 6, 2024, 01:15 PM IST
गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय? title=
after gown gang Chaddi-Baniyan gang active in nashik malegaon stole gold

Nashik Crime News:  चोर चोरीसाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतो. गेल्या काही काळापूर्वी मालेगावात गाऊन गँगची दहशत पसरली होती. त्यानंतर आता शहरात चड्डी-बनियान गँगने धुमाकुळ घातला आहे. मालेगावात घरफोड्याचे सत्र सुरूच असून असाच चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं छावणी पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याते आव्हान उभे राहिले आहे. तसंच, शहरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कॉलेज व एक घर फोडले आहे. तर येथून चोरट्यांनी रोख रकमेसह 6 तोळे सोनं चोरी केलं आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवून चोर चोरी करत आहेत. त्यामुळं शहरातील स्थानिक आणि व्यापारी वैतागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घरांबरोबर दुकानातही चोरी करण्यात आली आहे. मनमाड चौफुली येथील हार्डवेअर, इलेक्ट्रिक पंप, पाण्याचे दुकान यासरख्या सहा दुकानांत चड्डी बनियन गँगने दरोडा टाकला आहे. व तिथूनही लाखो रुपयांचा माल चोरी केला आहे.

चड्डी-बनियन गँगने शहरात धुमाकुळ घातल्याने आरोपींना लवकरत लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. चड्डी बनियान गँगने यापूर्वीही अशा कित्येक ठिकाणी दरोडा टाकला आहे. तसंच, या गँगकडून अनेकदा लोकांना धमकवण्यासाठी व घाबरवण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर केला जातो. या गँगने मालेगावातील अनेक घरांना निशाणा बनवलं आहे. धारदास शस्त्र दाखवून ही गँग चोरी करत आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

गाऊन गँगमुळंही मालेगाव चर्चेत

चोरटे चोरीसाठी वेगवेगळी शक्कल वापरताना दिसत आहे. यापूर्वीही मालेगावात गाऊन गँगची दहशत निर्माण झाली होती. ही गँग महिलांच्या गाऊन घालून चोऱ्या करत आहे. शहरातील अनेक भागात त्यांनी अशाप्रकारे चोऱ्या केल्या होत्या. सीसीटीव्हीमध्येही या गँगचा एक थरार कैद झाला होता. हातात धारदार शस्त्र घेऊन ते नागरिकांना धाक दाखवतात. त्यानंतर चोऱ्या करतात. गाऊन गँगनंतर आता शहरात चड्डी बनिअन गँग सक्रीय झाल्याचं समोर आलं आहे.