कॉफी शॉपवर धाड मारल्यावर आतमध्ये चालू असलेला प्रकार पाहून पोलिसही झाले थक्क!

कॉफी शॉपमध्ये बंद दरवाज्याचं कॅबिन करून...धक्कादायक सत्य आलं समोर!

Updated: Dec 4, 2022, 01:12 AM IST
कॉफी शॉपवर धाड मारल्यावर आतमध्ये चालू असलेला प्रकार पाहून पोलिसही झाले थक्क! title=

गजानन देशमुख झी मीडिया, परभणी : परभणी शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली मूळ मुलींना स्पेस उपलब्ध करून देत अश्लील चाळे करण्यास बढावा दिला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. परभणीत शहरातील देशमुख हॉटेल, कारेगाव रोड, ममता कॉलनी परिसरात अनेक कॉफी शॉप थाटण्यात आले आहेत. 

या भागात मोठ्या प्रमाणात क्लासेस आणि हॉटेल्स असल्याने या भागात मुलं मुली वास्तव्यास आहेत. शिक्षणासाठी बाहेर गावी आलेल्या मुला मुलींना वाम मार्गाला लावले जात असल्याचा आरोप करत सजग नागरिकांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांला सोबत घेऊन कॉफीवर धाड टाकली. कॉफी शॉपच्या नावाखाली चुकीचे प्रकार सुरू असल्याचे सुरू आले. 

कॉफी शॉपमध्ये बंद दरवाज्याचं कॅबिन करून मुला-मुलींना एकांत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तेथील कॉफी शॉप बंद करण्याची केली मागणी केली आहे.