बेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक!

Ahilyanagar Crime: अहिल्या नगरच्या चिचोंडी पाटील येथील मारुतीवाडी परिसरातून एक अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली होती.

Pravin Dabholkar | Updated: Oct 25, 2024, 03:12 PM IST
बेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक! title=
अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एक अंगणवाडी सेविका बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता पोलिस तपासात हादरवणारी बातमी समोर आली आहे. यामुळे आजुबाजूच्या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काय घडलाय नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

अहिल्या नगरच्या चिचोंडी पाटील येथील मारुतीवाडी परिसरातून एक अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली होती. यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली होती. तिचे सहकर्मचारी, शेजारी यांच्याकडे विचारपूस सुरु होती. दरम्यान या बेपत्ता अंगणवाडी सेविकेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमा पवार असं मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. 

उमा पवार या कालपासून बेपत्ता होत्या. यानंतर नातेवाईकांनी परिसरात आणि अंगणवाडीमध्ये शोध सुरु केला. त्यावेळी अंगणवाडीमध्ये कोणाच्या तरी रक्ताचे डाग आणि फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. यानंतर तिचा खून झालाय का? असा पोलिसांना संशय आला.  पोलिसांनी त्यापद्धतीने तपास सुरु केला. 

आजुबाजूला शोध घेतला गेला. यानंतर उमा पवार यांचा मृतदेह बाजूच्याच नदीमध्ये आढळून आला.या घटनेमुळे चिचोंडी पाटील आणि परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान नगर तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या अंगणवाडी सेविकेची हत्या कोणी आणि कशासाठी केली? याचा तपास केला जात आहेत. 

रमा पाटील यांचा मृतदेह शवविच्छादनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतर आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश

10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर; कारण ठरलं शिक्षिकेचा मार

महाराष्ट्रातील नालासोपारा, पालघर येथील 10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर आहे. तिच्या मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आळं आहे. ती आता आपल्या आयुष्याशी झुंज देत आहे. या 10 वर्षांच्या मुलीला ट्युशन टिचरने दोनवेळा कानाखाली मारल्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती परंतु पीडित मुलीला आठवड्याभरानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोपर्यंत तिची प्रकृती ढासळू लागली होती.एका 20 वर्षीय खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने मुलीला कानाखाली मारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 10 वर्षांची मुलगी वर्गात गैरप्रकार करत होती, असे ट्यूशन टिचरचे म्हणणे आहे. ही कानाखाली इतकी जोरदार होती की, शिक्षिकेने घातलेली कानातली अंगठी तिच्या गालात अडकली. मेंदूला गंभीर दुखापत, जबड्याचा त्रास आणि टीटीचा संसर्ग झाल्यामुळे मुलीला के.जे. सोमय्या यांना मुंबई रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या 9 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.