काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त

राज्यात शेवटच्या टप्प्यातली निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट झाली.  

Updated: Apr 25, 2019, 08:30 PM IST
काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त title=
काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी पदाचा राजीनामा दिला. (छाया सौजन्य - फेसबूक वॉल)

अहमदनगर : राज्यात शेवटच्या टप्प्यातली निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उघड उघड काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. तर करण ससाणेही तटस्थ राहिल्याने शिर्डीत काँग्रेसचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांची काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. दरम्यान, आता राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेस विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसची अवस्था कठिण झाली आहे.

मोठी बातमी । राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा

काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरला सभा आहे. त्यापूर्वीच ससाणे यांनी आपला राजीनामा दिल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने दिलेला हा दणका असल्याचे बोलले जात आहे. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर अहमदनगर काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलधापालथ सुरू झाली. नगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाणेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका ससाणेंनी घेतली. त्यानंतर काँग्रेसने काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्तही केली. त्यामुळे आता येथे काँग्रेसला आता नव्याने पक्षाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करावी लागणार आहे. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील आता आपल्यासोबत कोणाला नेणार याचीही उत्सुकता लागली आहे.

करण ससाणेंच्या बंडामागे राधाकृष्ण विखे पाटीलच असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे खुद्द राधाकृष्ण विखे पाटलांनी कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंसाठी काम करण्याचे आदेश दिले होते. आता तर त्यांनी विरोधी पदाचा राजीनामा दिल्याने ते काँग्रेसविरोधात काम करणार यात शंका नाही, अशीच चर्चा सुरु झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डी मतदारसंघात सातत्यानं काँग्रेसविरोधी भूमिका कायम ठेवली आहे. काँग्रेसमध्ये राहून सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेणारे विखे पाटील येत्या काळात मुलामागे भाजपत जातील का हे पाहावं लागेल.