झुंडशाहीचा न्याय: 4-4 महिलांना मारूनही तो सुटला, लोकांनी भर-रस्त्यावर दिला मृत्यूदंड

Ahmednagar Crime : चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे जमावाने हत्या केली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 11, 2023, 11:37 AM IST
झुंडशाहीचा न्याय: 4-4 महिलांना मारूनही तो सुटला, लोकांनी भर-रस्त्यावर दिला मृत्यूदंड title=

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर :  अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. चार महिलांच्या खुनाचा आरोप असलेल्या आणि काही प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीची जमावाणे मारहाण करुन हत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आक्रमक जमावाने केलेल्या मारहाणीमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव येथे हा सगळआ धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास घडली. चार महिलांच्या खून प्रकरणात मृत व्यक्तीची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र निर्दोष सुटलेल्या आरोपीने जेल बाहेर येताच मुलींची छेड काढल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याच्या घरावर हल्ला करून मारहाण करत त्याची हत्या केली आहे. मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चार महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेल्या अण्णा वैद्य याने रविवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. हा सगळा प्रकार गावातल्या लोकांना कळताच त्यांनी अण्णा वैद्य याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांत फिर्याद दिली. तोपर्यंत पोलीस ठाण्यात देखील छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र त्याचे वेळी आक्रमक झालेल्या जमावाने अण्णा वैद्य याला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत वैद्यला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी वैद्यची तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.

अण्णा वैद्य याच्यावर चार महिलांचा खून करून त्यांचे मृतदेश शेतात पुरून ठेवल्याचा आरोप होता. संगमनेर इथल्या कमलबाई उर्फ जराबाई कोल्हे या महिलेचे अपहरण करुन खून केल्याचा आरोप अण्णा वैद्य याच्यावर होता. कमलबाई कोल्हे यांचा मावसबहिण अंजना कराळे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरुन वाद झाला होता. कमलबाई यांचे कराळे आणि वैद्य याने अपहरण करुन तिला ठार मारल्याची फिर्याद त्यांच्या मुलीने दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कमलबाई यांचा सांगाडा अण्णा वैद्य याच्या शेतात सापडला होता. त्यावेळी 2006 साली अपहरण करुन खून केल्याचा ठपका वैद्य याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र खून करुन कमलाबाईंचा सांगाडा वैद्यच्या शेतात ठेवल्याचे सिद्ध न झाल्याने कोर्टाने अण्णा वैद्यची निर्दोश मुक्तता केली होती.  रविवारी संध्याकाळी त्याने अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढल्यामुळे संतप्त जमावाने त्याला मारहाण केली तसेच पोलिसांत फिर्याद दिली.