शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 16, 2018, 07:40 PM IST
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी  title=

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

शिवसेनेकडून तोडफोड

अवघ्या तीन दिवसांवर शिवजयंती आली असताना, उपमहापौर छिंदम यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या प्रकारानंतर उपमहापौरांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत शिवसेना रस्त्यावर उतरली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या निवासस्थानी तसंच कार्यालयात दगडफेक आणि तोडफोड केली. 

छिंदम यांनी माफी मागितली

या प्रकारानंतर उपमहापौर छिंदम यांनी माफी देखील मागितली. मात्र छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांची भाजपमधून तसंच उपमहापौरपदावरून हकालपट्टी करण्याची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी केलीय.