मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप

Maratha Reservation :  मुंबई मोर्चाच्या अखेरच्या दोन दिवसांतील गुप्त बैठकांमध्ये काय झालं ते जरांगेंनी उघड करावं अशी मागणी अजय महाराज बारसकर यांनी केली आहे. बारसकर यांनी जरांगेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 21, 2024, 03:58 PM IST
मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच विश्वासू जोडीदाराकडून अत्यंत गंभीर आरोप title=

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचा प्रश्न सरकारने जवळपास मार्गी लावला आहे. मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूर झाले आहे. राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आला. मराठा समाज विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मराठा आंदोलनात उभी फुट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे विश्वासू जोडीदार आणि त्यांच्या अत्यंत जवळचा मित्र आणि किर्तनकार अजय महाराज बरासकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंनी अनेकांची घर उद्धवस्त केली. जरांगेचे सर्व व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंगसह सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा दावा  बरासकर यांनी केला आहे. 

एकीकडे आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगेंचे सहकारी बरासकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.  जरांगे हेकेखोर माणूस आहे.  रोज पलटी मारतात. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही. लोणावळा आणि वाशीत अधिका-यांसोबत गुप्त बैठका घेतल्या.  जरांगें सरकारला निवेदन देत नाहीत  असे गंभीर आरोप बारसकर यांनी केले आहेत. 

सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेंचा उपोषणाचा बनाव 

सरकारवर दबाव आणण्यासाठी जरांगेने उपोषणाचा बनाव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत यावेत त्यांनी त्यांना पाणी पाजावे यासाठा जरांगे यांनी उपोषण सोडताना देखील अट्टहास केला. जरांगे यांचे उपोषण श्रेयवादासाठी आहे. गरीब लोक आरक्षण मागतात. पण, जरांगेंवर JCB फुले उधळणारे लोक आले कुठून? यांना पैसे कोण देतं असे सवाल बारसकर यांनी उपस्थित केले आहेत. जरांगेविरोधातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. 10 फेब्रुवारी रोजी आंदोलन सुरु करणार हे समाजाला सांगितले होते. उपोषणाला बसण्यापूर्वी मराठा बांधवांना जरांगेंनी विश्वासात घेतले होते. 

जरांगेनी अनेकांची घरं उद्धवस्त केली

जरांगे चे दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेनी चार शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त केली.  जरांगेनी मराठ्यांची घरं उद्धवस्त केली. लक्ष कसं वेधून घेता येईल हे जरांगेला चांगलं माहित आहे. TRP मिळवण्यासाठी मुद्दाम तो पत्रकारांसमोर लोकांची मिडियाची फसवणुक होईल अशा भाषेत बोलतो. जरांगेची भाषा शिवराळ आहे असे अवनेक गंभीर आरोप बावसरक यांनी केले आहेत.