कडक ना भावा, कांदा लिलाव ठप्प मग पठ्ठ्याने 'दादा स्टाईल' मांडली व्यथा

पैज लावून सांगतो,आवाज ऐकून तुम्ही अजित पवारांचं नाव घेणार!

Updated: Dec 13, 2022, 12:17 AM IST
कडक ना भावा, कांदा लिलाव ठप्प मग पठ्ठ्याने 'दादा स्टाईल' मांडली व्यथा  title=

Ajit Pawaer Mimicry : सोशल मीडियावर अनेक व्हायरल होतात, यामधील काही व्हिडीओंमध्ये काही अवलिया हुबेहुब मिमिक्री करताना दिसतात. अशाच प्रकारे सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar mimicry viral video) यांचा आवाज काढणाऱ्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Ajit Pawaer Mimicry  Solapur Farmer Sanjay Sarat viral video latest marathi news)

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये? 
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Krushi Utpanna Baazar samiti) आज व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादात कांदा लिलाव ठप्प झाला आहे. त्यामुळे मार्केट यार्डात कांदा घेऊन आलेले शेतकरी चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांची व्यथा संजय सरट या शेतकऱ्याने मांडली. 

महत्त्वाचं म्हणजे संजय यांनी अजित पवारांच्या आवाजात आपली प्रतिकिया देताना सर्व शेतकऱ्यांची व्यथा मांडली. मार्केट यार्डात संजय सरट अजित पवार यांचा आवाज काढताना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आवाजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांमधून पसंती मिळताना दिसून येत आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

दरम्यान, अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात. अनेकदा चालू भाषणातही तिथल्या तिथं काही गोष्टींबाबत निर्णय घेताना दिसतात. महत्त्वाचं म्हणजे एकवेळ घड्याळ पुढे-मागे होईल पण अजित पवार वेळेच्या बाबतीत एकदम पक्के.  पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचा सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रमांचा धडाका चालू व्हायचा. त्यामुळे दादांसारखा आवाज काढणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.