अजित पवार यांनी व्यक्त केली खंत, 'कार्यकर्त्यांनी मला अडचणीत आणलं'

 कोरोनाच्या (Coronavirus) नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याच कार्यक्रमात तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. 

Updated: Jun 19, 2021, 09:54 PM IST
अजित पवार यांनी व्यक्त केली खंत, 'कार्यकर्त्यांनी मला अडचणीत आणलं' title=

पुणे : कोरोनाच्या (Coronavirus) नियमांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याच कार्यक्रमात तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उदघाटन झाले. या कार्यक्रमात कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यावरून अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही झाली. चूक लक्षात येताच अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. (Ajit Pawar apologizes, 'activists got me in trouble') विशेष म्हणजे विकेंडल्या घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाईचा इशारा सकाळी अजित पवारांनी दिला होता. 

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी 

सकाळी 7 ला देखील उड्डाणपुलाचे उदघाटन केले आहे. गाडीत असताना उदघाटन न करता निघून जावे, असा विचार आला. मात्र कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असता, मात्र त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही (कार्यकर्त्यांनी) नियम पाळले नाहीत, त्यामुळे मनात खंत वाटते, अशी भावना गर्दीनंतर टीका झाल्यानंतर अजित पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...

कुठल्याही प्रकारे गटातटाचे राजकारण होता कामा नये. सर्वांच्या साक्षीने कार्यालयाचे उदघाटन झाले, असे मी जाहीर करतो. उदघाटन झाल्यानंतर 15 लाखांचा चेक मिळाला तो शहराध्यक्षांकडे दिला, महाराष्ट्राच्या जनतेला लवकरात लवकर लसीकरण कस करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

लवकरच शहराची कार्यकारणी करावी लागणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा यावेळी प्रयत्न करणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन आपण पर्यटनाचे काम करतोय. आघाडीत काम करत असताना कुणी काही जरी वक्तव्य केली तरी तुम्ही काही बोलू नका, वरिष्ठ पातळीवर बोलतील असं सांगा. तिन्ही पक्षाना सोबत घेऊन काम करायचं आहे, असे राष्ट्रवादी-शिवसेना वाद्यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला.

दरम्यान, आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आज शिवसेनेचा वर्धापनदिन आहे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.