पुणे : Ajit Pawar criticized on Shinde-Fadnavis Govt.राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, असा प्रश्न विचारल्यावर लवकरच असं उत्तर मिळते. राज्यात चांद्यापासून बांदयापर्यंत विविध प्रश्न निर्माण होतात, पण निर्णय घेणार कोण? असा सवाल विचारला जात आहे, अशी टीका अजित पवारांनी केलीय.
मंत्रीमंडळ स्थापन नाही जास्त वेळ होऊन गेला. मंत्रीमंडळ विस्तार करा, काही ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत आहेत. नवीन निर्णय घेतले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालपा भेटलो, अशी माहिती अजितदादा यांनी दिली.कोणी कुठल्या पदावर बसले की सगळी कामं होतात, असं नाही. काही अडचणी आल्या तर काम करता येत नाही. राजकिय नाट्य घडल पुढं काय घडलं, अजून मंत्रीमंडळ अजून नाही. सचिवांना फोन केला, अधिकारी नाही म्हणत नाही. सत्तेवर असताना अधिकारी जपले पाहिजेत. काही लोक सत्तेत आले की अधिकाऱ्यांना वेगळे वागणूक देतात, अशी टीका अजित पवार यांनी केली.
मला स्वतःला विरोधी पक्ष नेता म्हणून 11 वी तुकडीला मान्यता द्या, अशी मागणी येते. जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जात नाही. म्हणून म्हणतोय मंत्रिमंडळ विस्तार करा. मुख्यमंत्र्यांनी लवकर करु, लवकर करु म्हणणं बंद करावे. कायदा्याचं पालन करा, दवाखान्यात बारा ते एकपर्यंत घोषणाबाजी केली जाते. तारतम्य नाही याचं ? पुण्यात आले तेव्हा माईक बंद करायचं ते कळत नाही? उद्धव ठाकरे असताना शिस्तीने वागायचे. आता शिंदे सरकारचे मात्र वेगळेच पाहायला मिळत आहे. कायदे नियम करणारे राज्यकर्ते नियम तोडत असतील तर असाही बोलणारा वर्ग असतो. महाराष्ट्राची परंपरा आहे, तडा जाऊ देऊ नका, अशा शब्दात अजित पवार यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.
फडणवीस यांना कधी विचारले की, ते म्हणतात होईल! होईल !! होईल, असं सांगतात. आम्ही दोघं आहोत. दोघं काही करु शकतात का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. यांना दिल्लीतून सिंगल मिळेल तेव्हा होणार, यांच्या हातात काही नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे निर्णय हे महारष्ट्र होत होते, असे अजित पवार यांनी टिका करताना सांगितले.
दरम्यान, कार्यालय उघडून चालणार नाही लोकाचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी कानउघडणी अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांची केली. सगळे काम माझ्याकडून होत नाहीत, असा दावा मी करु शकत नाही, असे ते म्हणाले.