कोरोनाची साखळी तोडणं महत्त्वाचं, एकमेकांचं सहकार्य हवं - अजित पवार

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.   

Updated: Apr 10, 2021, 05:39 PM IST
कोरोनाची साखळी तोडणं महत्त्वाचं, एकमेकांचं सहकार्य  हवं - अजित पवार

पुणे : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू न करता काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीबद्दल अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला आवाहन केलं आहे. ते म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकाला कोरोनामुळे त्रास होत आहे. काहींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. पण कोरोनाचा साखळी तोडणं फार महत्त्वाचं आहे. या परिस्थितीत राजकारण न आणता एकमेकांचं सहकार्य  हवं, असं अजित पवार म्हणाले. 

पवार पुढे म्हणाले, 'केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांवर टोलवाटोलवी न करता काम करायला हवं. पहिल्या लाटेपेक्षा  आता सुविधा अधिक आहेत. पूर्वी लोकांच्या मनात कोरोना बाबत भीती होती. त्यामुळे बाधितांची संख्या कमी होती पण आता संख्या वाढत आहे.  असं पवार म्हणाले.