Ajit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले!

Ajit Pawar In Vajramuth Sabha:  राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

Updated: Apr 2, 2023, 08:19 PM IST
Ajit Pawar on Savarkar: "सावरकारांबद्दल आम्हाला आदर, ताबडतोब भारतरत्न देऊन...", अजित पवार स्पष्टच बोलले! title=
Ajit Pawar on Savarkar In Vajramuth

Ajit Pawar on savarkar: राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्या महापुरुषांबद्दल आदर आहे, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) झालेल्या मविआच्या 'वज्रमूठ' सभेत (Vajramuth Sabha) अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा सावरकरांवर मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले Ajit Pawar ?

राज्यात गौरव यात्रा काढण्याचं म्हणत आहेत. तुमच्यामध्ये धमक असेल आणि तुमच्यामध्ये ताकद असले ना.. केंद्रात तुमच्या विचारांचं सरकार आहे. राज्यात तुम्ही लोकं बसलाय. सावरकार यांच्याबाबतीत आम्हाला आदर आहे आणि अभिमान आहे. खरोखर तुम्हाला आदर आणि अभिमान असेल तर ताबडतोब सावरकरांना (savarkar) भारतरत्न देऊन दाखवा, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar on savarkar) यांनी भाजपला आव्हान दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी या सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर अजित पवार यांनी तोफ चालवली. उद्धव ठाकरे यांच्या काळात दीड लाख लोक कामाला लागतील, असे उद्योग इथे येत होते. शिंदे सरकारचा पायगुण चांगला नाही. हे आल्यानंतर सगळे उद्योग परराज्यात गेले, असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आणखी वाचा  - 'विरोधक तुम्हाला दगड म्हणतात', प्रश्न ऐकताच एकनाथ शिंदे म्हणाले "हे सर्व छोटे, मोठे..."

दरम्यान, तरुणांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका पवारांनी केला. सर्वोच्च न्यायालय म्हटलं होतं, की हे नपुंसक सरकार आहे. या सरकारला काही जनाची नाही तर मनाचीही वाटत नाही का? असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी सरकारची खरडपट्टी काढली. दुटप्पी राजकारण करत तुम्ही सत्तेत आले.  महापुरुषांची बदनामी झाली तेव्हा तुमची दातखिळ बसली होती का?, असा परखड सवाल अजित पवारांनी विचारलाय.