Ajit Pawar On Maharashtra CM Post: उपमुख्यमंत्री अजित पवार हे तब्बल पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत.. मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना अद्याप मिळाली नाही.. मात्र अजितदादांच्या मनातली ही खदखद अनेकदा बाहेरही येते.. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विधानसभेला मी सिनिअर आहे. हे सगळे पुढे निघून गेले मात्र मी मागेच राहिलो, अशी खदखद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवली होती.. मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत दादांना खरंच काय वाटतं? मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का? असा प्रश्न अजित पवारांबाबत सर्वांना पडतो. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर दिलखुलास उत्तर दिलं. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काहीच महिन्यात सुरु होणार आहे. .आणि यंदाच्या विधानसभेलाही बारामतीच्या लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. लोकसभेत बारामतीच्या लढाईत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगली होती. मात्र विधानसभेला बारामती मतदारसंघातून स्वत: अजित पवार निवडणूक लढवतात. तेव्हा अजित पवारांविरोधात पवार कुटुंबातलाच उमेदवार उभा राहणार का.. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार अशी लढाई रंगणार का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवारांनी सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत.
मुख्यमंत्रिपदी संधी मिळणार का या प्रश्नावर उत्तर देताना, 'कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण होतील असं बोलायचं नसल्याचे' दादांनी सांगितलं. 'प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय पुढे वाटचाल करु शकत नाही'असे ते म्हणाले. 'झी 24 तास'च्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबाबत अजित पवारांनी स्पष्टोक्ती दिली आहे.महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. आम्ही जे काम केलंय त्याबद्दल मी बोलतोय. मला कोणावर टीका करायची नाहीय. आम्ही केलेली काम जनतेसमोर न्यायची आहेत.
मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात लवकर बैठक बोलवण्यात येणार आहे. यात समन्वयातून मार्ग काढला जाईल. राज्यातील कोणत्याही पक्षाने याला विरोध केला नाही. सर्वांनी पाठींबाच दिलाय. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. मी त्याच समाजात मोडतो. आरक्षण मिळायला पाहिजे, याला माझा पाठिंबा आहे.
राज्यात आणललेल्या विविध योजना राबवण्यासाठी तिजोरीत तितका पैसा आहे. मी 10 वर्षे अर्थसंकल्प मांडलाय. योजना मांडताना आर्थिक शिस्त मी पाळतो. मी कोणत्याही योजनेचे पैसे फिरवले नाहीत. काढलेल्या कर्जाचे व्याज तुम्हाला द्यावे लागतात. सर्व गोष्टी मी विचारपूर्वक केल्या आहेत.
पार्थ पवार निवडणूक लढणार का? या प्रश्नावर उत्तर प्रत्येकाचं ज्याने त्याने द्यावं. मला याबद्दल काही माहिती नसल्याचे अजित पवार म्हणाले.