....म्हणून गौतमी बैलासमोर नाचली; अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया

Gautami Patil  : सबसे कातिल, गौतम पाटील... अख्ख्या महाराष्ट्रात जिची हवा, त्या गौतमी पाटीलसाठी नादखुळा पब्लिक गोळा झाल्याचं चित्र दिसतं.  गौतमी स्टेजवर आली की, शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. अख्ख्या पब्लिकला येडं की खुळं करणा-या या मदमस्त लावणी अदाकारा असलेल्या गौतमीने आता चक्क बैलालाही दिवाना केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 28, 2023, 07:33 PM IST
....म्हणून गौतमी बैलासमोर नाचली; अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया title=

Ajit Pawar On Gautami Patil :  एकदा लावणी डान्सर  गौतमी पाटील (Gautami Patil)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचं कारणही अगदी वेगळं आहे. गौतमी पाटीलनं चक्क एका बैलापुढं डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं असा सल्ला  विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौतमीला दिला होता. त्यानंतर गौतमी  बैला समोर नाचली आहे. गौतमीच्या या अजब डान्सवर  अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. 

सबसे कातिल, गौतम पाटील

सबसे कातिल, गौतम पाटील... अख्ख्या महाराष्ट्रात जिची हवा, त्या गौतमी पाटीलसाठी नादखुळा पब्लिक गोळा झाल्याचं चित्र दिसतं.  गौतमी स्टेजवर आली की, शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडतो. अख्ख्या पब्लिकला येडं की खुळं करणा-या या मदमस्त लावणी अदाकारा असलेल्या गौतमीने आता चक्क बैलालाही दिवाना केले आहे. 

बैलापुढं नजरेतले बाण सोडले 

पुण्यातल्या मुळशीमध्ये एका कार्यक्रमात गौतमी चक्क एका बैलापुढं नाचली आहे. आतापर्यत लग्न, हळद, बारसं, वाढदिवसाला आपल्या लावणीनं सगळ्यांना घायाळ करणारी ही नटखट, अवखळ नार अशी ओळख असणाऱ्या गौतमीने एका बैलापुढं नजरेतले बाण सोडले आणि आपल्या नृत्याची अदाकारी दाखवली. 

बैलाच्या बर्थ डे गौतमीचा डान्स

ज्याच्यापुढं गौतमी एवढी अदाकारी पेश करत होती, तो बैलही काही साधासुधा नव्हता. बाव-या असं या देखण्या, राजबिंड्या बैलाचं नाव आहे. हट्टाकट्टा, डौलदार शिंगं आणि शिंगावर सजवलेले गोंडे. स्थानिक नेते सुशील हगवणे यांच्या या लाडक्या बैलाचा त्यादिवशी बर्थडे होता. त्यामुळं या बर्थडे बॉयपुढं नखरेल अदाकारी पेश करताना गौतमीनंही काहीच कमी ठेवलं नाही. गौतमीनं बैलापुढं केलेला हा डान्स सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे. 

सगळ्यांना पाहता येईल, असं काम करण्याचा अजित पवारांचा सल्ला

सगळ्यांना पाहता येईल, असं काम करण्याचा सल्ला अजित पवारांनी गौतमीला दिला होता. त्यामुळंच की काय,मुक्या बैलालाही पाहता येईल, असा नाच गौतमीनं केलेला दिसत अशी चर्चा रंगली आहे.  गौतमी पाटीलनं कुणासमोर नाचावं हा तिचा अधिकार आहे, कदाचित मालकानं आपल्या बैलाला शर्यत जिंकण्यासाठी गौतमीच्या डान्सचं आमिष दाखवलं असावं असं सांगत अजित पवारांनी गौतमीच्या डान्सवर मिश्किल प्रतिक्रिया दिली. नृत्य हा गौतमीचा व्यवसाय आणि तिच्या उपजीवकेचे साधन आहे. 
ती याकडे कला, अभिनय आणि उत्पन्नाच्या माध्यमातून बघते म्हणूनच तिने बैलासमोर डान्स केला असावा असे अजित पवार म्हणाले.