प्रसिद्ध निवेदिका, लेखिका सुधा नरवणे यांचे निधन

आपल्या लघुकथांबरोबरचं आकाशवाणीवर आपल्या आवाजासाठीदेखील त्या प्रसिद्ध होत्या.

Updated: Jul 24, 2018, 11:56 AM IST
प्रसिद्ध निवेदिका, लेखिका सुधा नरवणे यांचे निधन title=

मुंबई: आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसिद्ध निवेदिका आणि मराठी लेखिका सुधा नरवणे यांचं हदयविकाराच्या झटक्याने रविवारी (रविवार,२२ जुलै,) निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केलं. पुणे आकाशवाणीच्या सकाळी सातच्या बातम्या आणि सुधा नरवणे असं समीकरणचं होतं. 

महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मान

आपल्या लघुकथांबरोबरचं आकाशवाणीवर आपल्या आवाजासाठीदेखील त्या प्रसिद्ध होत्या. राज्य पुरस्काराबरोबरच अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. सुधा नरवणे यांच्या अनेक लघुकथा प्रसिद्ध आहेत, तरुण वयातचं त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती.आपल्या लघुकथांबरोबरच आकाशवाणीवर त्या आपल्या आवाजासाठी देखील प्रसिद्ध होत्या.

आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम

दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी ऑल इंडिया रेडीओचे प्रादेशिक केंद्र अर्थात आकाशवाणीसाठी निवेदिका म्हणून काम केले होते. त्यांच्या आवाजात अनेक वर्षे आकाशवाणीच्या सकाळी सातच्या बातम्यांचे प्रसारण होत असे. तरुण वयातच त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली होती. प्रा. एस. आर. पारसनीस हे त्यांचे वडील होत. त्यांच्या मागे पती मुकुंद नरवणे, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.