close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बँकेला लागलेल्या आगीत १० लाखांची रोकड जळून खाक

...तोपर्यंत सुमारे १० लाख रुपयांची रोकड या आगीत जळून खाक झाली

Updated: Jul 12, 2018, 01:37 PM IST

अकोला : ऐन पावसात अकोल्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला आग लागली. या आगीत १० लाखांची रोकड जळून खाक झाली. संगणकासाठी असलेल्या सर्व्हरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलंय. बँक रोखपालांच्या कक्षाशेजारीच असलेल्या सर्व्हर रूममधील बॅटरीनेही पेट घेतल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. 

रोखपाल स्वत:चा जीव वाचविण्यासाठी तिथून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी रोकड वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही रोकड स्वतःसोबत बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सुमारे १० लाख रुपयांची रोकड या आगीत जळून खाक झाली.