Prashant Damle: महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रशांत दामलेंचं तोंडभरून कौतूक, मराठीत पोस्ट लिहित म्हणाले...

Prashant Damle Record : एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग प्रशांत दामले यांनी षण्मुखानंद सभागृहात सादर केला. अशातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

Updated: Nov 6, 2022, 08:54 PM IST
Prashant Damle: महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रशांत दामलेंचं तोंडभरून कौतूक, मराठीत पोस्ट लिहित म्हणाले... title=
Amitabh Bachchan On Prashant Damle

Amitabh Bachchan On Prashant Damle: मराठी नाटकांना घरोघरी पोहोचवणारे प्रसिद्ध मराठी नाटककार प्रशांत दामले यांनी आज नवा विक्रम नावावर केला आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहातील दामले यांनी 12,500 व्या प्रयोगाचा विक्रमी टप्पा (Prashant Damle Record) पार केला. एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग त्यांनी षण्मुखानंद सभागृहात सादर केला. अशातच आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रशांत दामले यांचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

काय म्हणाले Amitabh Bachchan ?

प्रशांत दामले यांचा 12,500 प्रयोगांचा विक्रम आज होत आहे. फक्त 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे, असं अमिताभ (Amitabh Bachchan) म्हणतात. मी प्रशांतजींच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाच्या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो आणि तेव्हापासून मी प्रशांतजींच्या कामाचा चाहता आहे. आजही लोकांना मराठी नाटकावर प्रेम करायला लावण्यात प्रशांतजींचं मोठं योगदान आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.

आणखी वाचा- Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..

आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे. माझ्याकडून प्रशांतजींना आणि सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा.., अशी पोस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Instragram Post) यांनी इस्टाग्रामवर लिहिली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

पाहा पोस्ट - 

दरम्यान, प्रशांत दामले यांच्या ऐतिहासिक प्रयोगासाठी महाराष्ट्रचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनसे अध्यक्ष आणि कलाप्रेमी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील हजेरी लावली होती.