Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी

अमरावती लोकसभा निकाल 2024 News in Marathi:अमरातवीमध्ये भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.  

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 10:28 AM IST
Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडी title=

Amravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरातवीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत. भाजपाने नवनीत राणा यांनी तिकीट दिल्यानंतर मित्रपक्ष प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी जाहीर विरोध केला आहे. यानंतर दिनेश बूब यांना उमेदवारी दिली असल्याने नवनीत राणा यांच्यासाठी सोपी असणारी लढाई कठीण झाली आहे. प्राथमिक कलांमध्ये नवनीत राणा पिछाडीवर असून, बळवंत वानखेडे यांनी आघाडी घेतली आहे.

नवनीत राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. 

अमरावती मतदारसंघात एकूण 18.36 लाख मतदार असून, 64.02 टक्के मतदान झालं आहे. मेळघाट मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात