MP Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या एका हितचिंतकाने त्यांना पत्र लिहून सावध केले आहे. राजस्थानच्या सीमेवरून काही संशयित लोक अमरावतीत दाखल झाल्याचे पत्र लिहिणाऱ्याने म्हटले आहे. तो तुमच्या घरीही आला आहे. म्हणून मी अल्लाहकडे तुझ्यासाठी प्रार्थना करतो की तुला काहीही होऊ नये, असे पत्रात लिहिले आहे.
नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. हितचिंतकांकडून सतर्क राहा, असा पत्रात उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानं धमकीचं पत्र आल्याचं राणांनी म्हटलंय.
"काही लोक राजस्थान सीमेवरून अमरावतीत आलेत, ते लोक तुमच्या घरीही जाऊन आलेत. तसंच मी अल्लाला दुवा करतो की तुम्हाला काहीही होऊ नये," असेही या पत्रात म्हटले आहे.तसेच पत्राच्या शेवटी खुदा हाफिज, असेही लिहिण्यात आले आहे. खासदार नवनीत राणांच्या घरी आलेल्या पत्राने खळबळ उडाली असून, कोल्हे हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानं धमकीचं पत्र आल्याचं राणांनी म्हटलंय