धक्कादायक! बँकेत ठेवलेलं 5 किलो खरं सोनं अचानक झालं Duplicate, महाराष्ट्रात एकच खळबळ

59 खातेधारकांनी बँकेत ठेवलेले 5 किलो शुद्ध सोनं डुप्लिकेट झालंच कसं?   

Updated: Aug 18, 2022, 05:28 PM IST
धक्कादायक! बँकेत ठेवलेलं 5 किलो खरं सोनं अचानक झालं Duplicate, महाराष्ट्रात एकच खळबळ title=
संग्रहित फोटो

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेतील सोने तारण बनावट प्रकरणात बँकेचे धक्कादायक ऑडिट पुढे आलं आहे. बँकेच्या ऑडिटनुसार बँकेत कारण ठेवलेल्या तब्बल 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्राम सोने बनावट असल्याचं समोर आलं आहे.

राजापेठ पोलिसांनी ही माहिती दिली आहे. बँक व्यवस्थापनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बँकेत तारण ठेवलेल्या ९२ ग्राहकांपैकी 59 ग्राहकांचे 5 किलो 800 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांमध्ये छेडछाड केल्याचं मान्य करण्यात आलं आहे. याचवेळी 26 लॉकरमधील दागिने सुरक्षित असल्याची बाब बँकेच्या ऑडिटमध्ये पुढे आली आहे. 

59 लॉकर्समध्ये सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांच्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडले आहेत. ही चूक बँक व्यवस्थापनानेच मान्य केल्याने बँकेच्या लॉकरधारक आणि सुवर्ण तारण कर्जधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 

बँकेत खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी बनावट सोन्याचे दागिने कुठून आले, यामध्ये बँकेचे कोणते अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत याबाबत बँक प्रशासन चौकशी करत आहे.