मुख्यमंत्र्यांविरोधात अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे.  

Updated: Aug 2, 2019, 05:16 PM IST
मुख्यमंत्र्यांविरोधात अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी title=
वर्धा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा (छाया सौजन्य : @Dev_Fadnavis)

वर्धा : जिल्ह्यातील आयटकच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. भाजपची महाजनादेश यात्रा आज वर्धा जिल्ह्यात आहे. यावेळी अंगणवाडी, शालेय पोषण आहार आणि कंत्राटदारी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार होते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन करण्यात आले. 

यावेळी काही महिला आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र् सरकारतर्फे गटप्रवर्तकांना देण्यात येणारी रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्याचसोबत शालेय पोषण आहार कर्मचारी आणि कंत्राटी यांच्या विविध मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.